“खडसे विरोधातील कारवाई सूडबुद्धीने ते ईडीला घाबरत नाही”

 

मुंबई | पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या भूखंड खरेदी गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावळी गिरीश चौधरी यांची चौकशी करून ईडीने ताब्यात घेतले होते. तसेच ईडीने एकनाथ खडसे यांना सुद्धा चौकशीसाठी कार्यालयात धाडले होते.

त्यात खडसे यांनी सुद्धा ईडी कार्तलयात हजेरी लावली होती. सकाळी अकराला हजर झालेले खडसे रात्री आठ वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. याप्रकरणी राज्यातील भाजपविरोधी पक्षांकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे.

ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक म्हणाले आहे. यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली आहे.

Team Global News Marathi: