“छत्रपती घराण्यात माझा जन्म म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही”

 

कोल्हापूर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा ताट असताना पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आज कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ‘सारथीव्यतिरिक्त इतर मागण्यांबाबत सरकारकडून जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार,’असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांना तुम्ही शांतपणे आंदोलन का करताय असं विचारल्यावर माझा स्वभावच शांत आहे, ओरडून दंगा करून काय उपयोग ? कधी आवाज वाढवायचा हे मला नक्की कळतं आणि छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही, अशी समजच संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

सारथी संस्थेचे अध्यक्ष विजय निंबाळकर आणि संभाजी राजे छत्रपती यांची आज सारथी संस्थेबाबत चर्चा झाली. या दरम्यान राज्य सरकारला दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे सारथी संस्थेला जो काही निधी द्यायचा आहे तो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ द्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आज केली आहे.

Team Global News Marathi: