केतकी चितळेच्या आजाराबाबत सगळ्यांनाच माहिती, यामागे कर्ता-करविता वेगळाच

 

अभिनेत्री केतकी चितळेनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे अभिनेत्रीला अटक झाली आहे. या आधी केतकी तिला असेलल्या एका आजारामुळे चर्चेत आली होती. आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केतकीच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत तिच्या आजाराविषयी टीका केली आहे, त्याच बरोबर यामागे कर्ता करविता कोणी वेगळाच असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच काल झालेली देवेंद्र फडणवीस यांची सभा व इतर राजकीय घडामोडींवर भाष्य कर विरोधकांवर निशाणा साधला आहे.

केतकी चितळे पोस्ट प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे, त्या म्हणाल्या केतकी चितळेबाबत बोलायचं झालं तर तिच्या आजारपणाचं सगळ्यांनाच माहिती आहे. तिच्या या कृत्यामागे कर्ता करविता वेगळा आहे. शरद पवारांबद्दल जी टीका केली. ज्याचे समर्थन सदाभाऊ खोत तुम्ही करताय? तुमचं वय काय आहे ? त्यात त्यापेक्षा राजकारणात किती वय आहे हे बघावं. या विकृत प्रवृत्तीचं समर्थन करू नये असा सल्ला पेडणेकरांनी दिला आहे.

Team Global News Marathi: