सरकारमध्ये काँग्रेस राहणार की नाही? नाना पटोलेंनी थेटच सांगितलं

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांचा सपाटा सुरुच ठेवला आहे. आज देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपला मदत केल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. सोबतच महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहण्याबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाढ होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आज बोलताना पटोले यांनी म्हटलं की, गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचा राजकारण करत आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचा उल्लंघन होत आहे.त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही.

तसेच पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, यावेळी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसतीलच, आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Team Global News Marathi: