मुंबई | | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत उद्भवणाऱ्या आव्हानांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वांनी मास्क वापरल्यास त्रास कमी होईल असं सांगितलं. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना डिझायनर मास्क वापरासंबंधीत प्रश्न विचारला असता, त्यांनी माझा मास्क थ्री लेअर आहेच. मात्र महिला म्हणून मला मॅचिंग हवं असतं, महिला म्हणून सौंदर्य हा माझा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांनी डिझायनर मास्कचा फायदा नसल्याचं म्हटलं होतं.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत महापालिका प्रशासनाकडून केल्या गेलेल्या तयारीबद्दल माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी डिझायनर मास्क वापरा बद्दल प्रश्न विचारला. असता आपला हा मास्क तीन लेअरचा असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच महिला म्हणून काही सुप्त गुण असतात. मॅचिंग हवं असतं, त्यामुळे मी हा मास्क वापरत असल्याचं त्यांनी म्हंटल होत.
तसेच दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत मास्कच्या वापराबद्दल माहिती देताना डिझायनर मास्क फारसे फायद्याचं नसून, एन- ९५ मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता. आता महापौर पेडणेकर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला किती मनावर घेतायत हे पाहावे लागणार आहे.