केंद्राने निधी न दिल्यामुळे बेस्टने इलेक्ट्रीक एसी बस घेण्याचा प्रस्ताव गुंडाळला

 

मुंबई | बेस्ट उपक्रमाने १,२०० एकमजली आणि मिडी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता मात्र आता तो निर्णय रद्द केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान न मिळाल्याने हा प्रस्ताव रद्द करण्याची नामुष्की बेस्ट समितीवर ओढवली आहे. त्यावरून सत्ताधारी शिवसेना व विरोधात बसलेल्या भारतीय पूजनात पक्षामध्ये कलगीतुरा रंगला आहे.

बेस्टने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये १,२०० बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निविदाही काढली. सुमारे ५ हजार कोटी खर्च असलेल्या या सर्व बसेस वातानुकूलित इलेक्ट्रीक होत्या. त्यात ८०० बस एकमजली, तर ४०० मिडी बसचा समावेश आहे. या बस महाराष्ट्र शुद्ध हवा अभियानांतर्गतच घेण्यात येणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार होते.

मात्र दुसरीकडे आजतागायत ते मिळाले नाही. त्यामुळे या विषयावर बेस्ट समितीच्या सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्राच्या असहकार्यामुळे वाढता खर्च लक्षात घेऊन या बसगाड्यांचा प्रस्ताव रद्द करावा, अशी सूचना बैठकीत मांडण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या सूचनेला पाठिंबा दिला.
बेस्टकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे भाडेतत्त्वावरील या बस घेण्याचा विचार मागे पडला. परिणामी, हा प्रस्ताव तूर्तास रद्द करण्यात येत आहे. निधी उपलब्ध झाल्यास भविष्यात तो पुन्हा मांडण्यात येईल, असे बेस्ट समिती अध्यक्ष चेंबूरकर यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: