भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, दिगंबर आगवणे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची खोटी बिले बनवून आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिगंबर आगवणे यांनी न्यायालयात केली होती.

तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व कारखान्याचे इतर तीन संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरीकडे गिरीश ऊर्फ विपुल बजरंग येवले ( वय ३३, रा. मुंजवडी, ता. फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिगंबर आगवणे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आगवणे यांनी दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सन २०१९ मध्ये दिगंबर आगवणे यांनी येवले यांच्याकडून त्यांचे नातेवाईक व माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या मध्यस्थीने दहा लाख रुपये विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी घेतले होते.निवडणूक झाल्यावर पैसे देतो,’ असे त्यांनी सांगितले होते. मात्र, निवडणूक होऊन तीन वर्षे झाली तरी पैसे न देता त्यांनी टाळाटाळ केली तसेच खोटा धनादेश देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे येवले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Team Global News Marathi: