कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकाच्या निधनामुळे राज्यपालही हळहळले

 

राजभवन येथे कार्यरत असलेले राजभवन सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळ यांच्या आकस्मिक निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.बुधवारी दुपारी राजभवन परिसरातील कार्यालयामध्ये असताना भुजबळ यांच्या छातीमध्ये दुखू लागले होते. यानंतर त्यांना तात्काल मुंबईतील बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

पोलीस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळ कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व मनमिळावू अधिकारी होते. हसतमुख असलेले भुजबळ यांचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपण एका संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याला मुकलो आहो, या शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

विकास धोंडीराम भुजबळ (वय – 55) यांना बुधवारी दुपारी राजभवन परिसरातील त्यांच्या कार्यालयात असतानाच छातीत दुखू लागल्याने इतर अधिकाऱ्यांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भुजबळ यांनी मुंबई आणि राज्यात इतर अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

आमदार गोपीचं पडळकरांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़ांदीवणसांकडे केली ही मागणी

शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेसकडे शिंदे गटाचे लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क?

Team Global News Marathi: