राहुल शेवाळे यांच्या विरोधातील तक्रारीवर कार्यवाही करा, महिला आयोगाचे आदेश

 

खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेने एप्रिल महिन्यात साकीनाका पोलिसात तक्रार दिली होती. मात्र त्यावर अद्याप कुठलीच कारवाई न झाल्याने त्याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने साकीनाका पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे शेवाळे यांच्या अडचणी अधिक वाढणार आहे.

राहुल शेवाळे यांच्या विरोधात त्यांच्या ओळखीच्या एका महिलेने एप्रिल महिन्यात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याला तीन महिने उलटले तरी कुठलीच कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगात जाऊन याबाबत आपली व्यथा मांडली. तिने तशी तक्रारच आयोगाकडे केली.

आयोगाच्या वतीने मंगळवारी साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयास बोलावून एप्रिलमध्ये महिला तक्रार दाखल करते आणि त्यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नाही याबाबत खेद व्यक्त करण्यात आला. तसेच पीडित महिलेच्या तक्रारीबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

आमदार गोपीचं पडळकरांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़ांदीवणसांकडे केली ही मागणी

शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेसकडे शिंदे गटाचे लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क?

Team Global News Marathi: