काली मातेला दारूचा नैवेद्य असतो तर… वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात

 

अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या अभिनयापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. मग कधी ती सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करते तर कधी एखाद्या वारसीथ नेत्यांवर टीका करते. केतकी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. आता देखील तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चांगलीच प्रसिद्धही झोतात आली आहे.त्यातच केतकीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रावर स्वतःचा एक व्हडिओ शेअर केला. आता तिची ही इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र नेहमीप्रमाणे आपल्याला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला केतकी चितळे सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. नेटकाऱ्यानी केलेल्या कमेंटला उत्तर देताना केतकी यावेळी चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसते. केतकीने नवीन वर्षाच जोरदार सेलिब्रेशन केलं आणि याच पार्टीचा एक व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘माफ करा पण कधीही विसरू नका. हॅप्पी न्यू इयर’ असं म्हणत दारू पिताना दिसतेय. तसेच तिने या व्हिडिओ खाली “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ.. लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100 % गलत है..” असं कॅप्शन देखील दिल आहे.

केतकीचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकरी म्हणतो, “वाह दीदी. लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका. आणि आपण ढोसायचं..” यानंतर केतकीने देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिल. केतकी म्हणते, “मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही… स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका”, अशी कमेंट केतकीने केली आहे. त्यावर त्या नेटकऱ्याने माघार घेत अतिशय सुंदर माहिती धन्यवाद असं म्हणत थेट हात जोडले.

Team Global News Marathi: