अजित पवारांनी मतांसाठी लाचार होऊन विधान केले, भाजपचा गंभीर आरोप

 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. “छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काहीजण धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही.” असे ते म्हणाले होते. या विधानाविरोधात भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानेदेखील आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन होत आहे.

जगदीश मुळीक म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे विधान केले आहे. ते निषेधार्थ असून अजित पवार यांनी त्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागावी. मतांसाठी लाचार होऊन अजित पवारांनी विधान केले आहे.” असा आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्याविरोधात राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुण्यातील डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे ?

अजित पवार काय म्हणाले त्याबाबत कोणता संदर्भ दिला मला माहीत नाही. पण अजितदादा बोलले ते अर्धसत्य आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच. पण ते धर्मवीरही होते. त्याबाबतचे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत, असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. संभाजी छत्रपती पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

Team Global News Marathi: