मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सूरु झाली आहे.
५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेवर होणारी टीका वाढली आहे. शिवसेना हिंदुत्त्वापासून दुरावल्याची टीका भाजपसह विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. यादरम्यान मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे आगामी मे महिन्याच्या सुरुवातीलाच आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. स्वतः आदित्य ठाकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.