कच्चा कांदा आवडीनं खाणाऱ्यांनो सावधान व्हा होऊ शकतो !

 

मुंबई | जेवण असो वा नाश्ता कच्चा कांदा काहीजणांना खायला आवडतो. मग तो लाल कांदा असो किंवा पांढरा पण जेवणार किंवा मिसळ, पावभाजी सारख्या स्नॅक्ससोबत कच्चा कांदा तर हवाच. पण तुम्हाला माहीत आहे का? कोणत्याही गोष्टीबाबत अति केलं की त्याची माती होते. कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाण्याचे तोटेही आहेत. तुम्हाला आतापर्यंत फायदेच माहिती असतील पण कच्चा कांदा अति प्रमाणात खाल्लाने शरीराला नुकसान देखील होऊ शकतं. याच याबाबत जाणून घेऊया.

कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी धोक्याचं असतं. जर तुम्ही कांदा अति प्रमाणात खाल्ला तर रक्तातील साखर वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते. कांद्यामध्ये ग्लूकोज आणि फ्रुक्टोज नावाचे घटक असतात. त्यामुळे फायबर जास्त असतं. अति कांदा खाल्ल्याने काहीवेळा अपचनाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ज्यांना जड पचत नाही अशा लोकांनी शक्यतो कच्च्या कांद्याचे सेवन करणं टाळावं.

ज्या व्यक्तींना डायबेटीजचा त्रास आहे अशांनी कच्चा कांदा खाणे टाळा. शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कांदा खावा. नाहीतर अशा लोकांना कच्चा कांदा खाणे धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचे आहे. छातीत जळजळण्याच्या समस्याही जाणवू शकतात.

Team Global News Marathi: