,’बबली अजूनही मोठी झाली नाहीये, ती नासमझ.’ पेडणेकरांनी लगावला नवनीत राणांना टोला

 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासह राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आता सशर्त जामीन मिळाल्यानंतर आज नवनीत राणा याना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यन, रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

लीलावती रुग्णालयाबाहेर पत्रकारांशी बोलत असताना नवनीत राणा यांनी यावेळी “मी अशी काय चूक केली की त्याची शिक्षा देण्यात आली,” असा सवाल ठाकरे सरकारला केला. तसेच १४ दिवसच काय, तर १४ वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

तसेच येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेने विरोधात आपण प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. कोणत्या पक्षाच्या बाजूने प्रचार करणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. आता राणा यांनी केलेल्या टीकेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

माध्यमांशी बोलतांना किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’याला हल्लाबोल नाही म्हणत याला खाज म्हणतात, शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यामुळे अनेकांची पोट दुखी होत आहे. त्यातीलच हे एक आहे.’ तसेच बबली अजूनही मोठी नाही झाली, बबली नासमझ आहे. मुंबईकरांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका उद्ध्वस्त करण्यासाठीच मी ताकदीने मैदानात उतरणार आहे, असं नवनीत राणा यांनी जाहीर केलं.

Team Global News Marathi: