“जो होगा वो देखा जायेगा”; संजय राऊतांनी दंड थोपटले

 

महाराष्ट्रात अनेक भागात सध्या पुराचा हाहाकार सुरु आहे, अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे, पण मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरु असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घरांवर चौकी पहारे लागलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त अचानक काही खासदारांच्या घरांवर लावण्यात आला आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणा, पैशांचा वापर केला जातोय. ब्लॅकमेलिंगही होतंय. पण ठिक आहे. जो होगा वो देखा जायेगा. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला आम्ही तयार आहे.

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर त्यांची रुटिन व्हिजिट आहे. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड इथे आहे, म्हणून त्यांना दिल्लीत यावं लागतं. मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री मी पाहिलेयत दोन. एक मनोहर जोशी, दुसरे नारायण राणे. पण त्यांना मी कधी दिल्लीत आल्याचं पाहिलं नाही. त्यांच्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या.

पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

धान्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू,

Team Global News Marathi: