केंद्रात श्रीकांत शिंदे यांना संधी’? पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना देणार स्पेशल गिफ्ट

 

शिवसेनेच्या आमदारानंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीत शिवसेनेचे १९ पैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुपारी शिंदे समर्थक खासदारांसह पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. आमदारांनंतर शिवसेना खासदारांनी वेगळी वाट धरल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपा सरकार केंद्रात २ मंत्रिपदे शिंदे गटाला देतील असं सांगितले जात आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील खासदारांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री पद मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रातील कॅबिनेट विस्ताराबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येईल. २० जुलैला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे.

“जो होगा वो देखा जायेगा”; संजय राऊतांनी दंड थोपटले

पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

Team Global News Marathi: