जेठालालने घेतली आलिशान गाडी इतकी आहे ‘त्या’ गाडीची किंमत

 

प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही गेली अनेक वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तारक मेहतामधील दया आणि जेठालाल या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जेठालाल ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी हे साकरतात. सध्या दिलीप जोशी यांचा एका आलिशान गाडीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिलीप जोशी यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ब्लॅक कलरची Kia Sonet सबकॉम्पॅक्ट SUV ही गाडी दिसत आहे. या गाडीची किंमत १२.२९ लाख रूपयांपासून सुरू होते. दिलीप यांनी दिवाळीला ही गाडी घेतली आहे. या सबकॉम्पॅक्ट SUV गाडीमध्ये काही नवे फिचर्स आहेत. सोशल मीडियावरील दिलीप यांच्या फोटोमध्ये त्यांचे कुंटुंब देखील दिसत आहे.

एका मुलाखतीमध्ये दिलीप यांनी सांगितले होते की, ‘मला रोज अनेक लोक विचारत होते की दिशा माझी पत्नी आहे का? मी त्यांना सांगतो की जयमाला ही माझी पत्नी आहे.’ २८ जुलै २००८ रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली १३ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Team Global News Marathi: