“एसटी महामंडळाचा प्रश्न चिघळण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार”

 

नगर | राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनत चालला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. मात्र राज्य सरकारकडून कडून अजूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळत नाहीय. या सगळ्या प्रकारावर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

विखे पाटील म्हणाले. राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी जवळपास ७० एसटी आगारांमधील कर्मचारी-कामगारांकडून सुरू असलेल्या संपाचा तिढा अजूनही कायम राहिला. राज्यभरातील हजारो कर्मचारी संपावर गेले असून त्यांनी आता बेमुदत आंदोलन पुकारलं आहे.

आज परिवहन महामंडळ आणि कर्मचारी वाऱ्यावर आहेत. कर्मचाऱ्यांची मागण्या काय आजच्या नाहीयत. सध्या मंत्री तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी अवस्था असल्याची टीका विखे पाटलांनी केली. कर्मचाऱ्यांशी तात्काळ संवाद साधणं सुरु करा, असा सल्ला विखेंनी राज्य सरकारला दिला. मुलभुत मागण्या मान्य करून राज्यातील जनतेचे हाल थांबवा, अशी मागणीही त्यांनी केली.

दिवाळीच्या दिवसांत एसटी, रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण झाल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी सुरू होते आणि विशेषत: पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांची सर्रास लूट चालते. सध्या या दोन्ही ठिकाणांसाठीचे खासगी ट्रॅव्हल्सचे दर दोन हजारांवर पोचले असून त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे

Team Global News Marathi: