प्रकाश आंबेडकर यांचा बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या आठवले गटाचे माजी पदाधिकारी जगदीश गायकवाड याला अटक

(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांची युती झाली आहे. एकीकडे या युतीच्या चर्चा असताना दुसरीकडे पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चुनाभट्टी पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी जगदीश गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मुंबईतील चुनाभट्टी येथे पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास चेंबूर येथील हॉटेलमध्ये बसले होते.

यावेळी जगदीश गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. हॉटेलमध्ये जगदीश गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर गायकवाड यांनी या कार्यकर्त्याला मारहाण केली. कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली. यावेळी जगदीश गायकवाड यांच्यावर कार्यकर्त्यांनी इतरही अनेक आरोप केले

Team Global News Marathi: