संतोष बांगर यांच्या दादागिरीमुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज, न बोलता गाडीचा दरवाजा लावून गेले निघून

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा चर्चेत आले असून एका प्राचार्याला मारहाण प्रकरणामुळे वादात अडकले आहे. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाराज झाले असून यावर बोलण्याचं टाळलं. शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच आहे. आता त्यांच्यावर सर्व स्थरातून टीका होताना दिसून येत आहे.

संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनाच मारहाण केली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी सोड सोड नको ते असं म्हणून बोलण्याचं टाळलं. संतोष बांगर यांच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी एका प्रकारे नाराजीच बोलून दाखवली आहे.

तसंच, दिल्लीमध्ये ऊस उद्योगासंदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित पार पडली. राज्यात आपलं सरकार आल्यापासून केंद्रातून मदत मिळत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्राकडून सहकार्य मिळेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ‘महाराष्ट्रात आपली परंपरा राहिली आहे. एखाद्या जागेवर एखाद्या सदस्याचं निधन होतं तेव्हा सगळेजण सहकार्य करतात आणि ती निवडणूक बिनविरोध होते याचं उदाहरण आपण मुंबईत पाहिलं आहे, पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे, असं आवाहनही शिंदेंनी केलं.

Team Global News Marathi: