‘हे’ घराबाहेर पडायला घाबरतात त्याला आम्ही काय करणार? नाव न घेता राज ठाकरेंनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

 

मुंबई | राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारवर घणाघाती हल्लबोल केला होता. मुंबई, ठाण्यात आज ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारचे नियम झुगारुन दहिहंडी फोडली जात आहे. यात मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आता मनसे कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या अटकेवरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. “जनआशीर्वाद यात्रा यांना चालते. त्यात कोरोना पसरत नाही. पण सण चालत नाहीत. कोरोना फक्त सणांमधूनच पसरतो का?”, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच ‘हे’ घराबाहेर पडायला घाबरतात त्याला आम्ही काय करणार?, असा टोला सुद्धा रा ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला होता.

राज्यातील लोकांना कोरोनाची भीती घालून घाबरविण्याचं काम सरकार करतंय असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. “कसला लॉकडाऊन आहे? कुठं आहे लॉकडाऊन? सारं व्यवस्थित सुरू आहे. आज फक्त लोकांना कोरोनाच्या नावानं भीती घालायचं काम सरकार करत आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती या सरकारची झाली आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: