कोरोनाची तिसरी लाट येते ! राज ठाकरे म्हणतात “लाट यायला समुद्र आहे का ?”

 

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग, लॉकडाऊन आणि परप्रांतीयांचे हल्ले यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्यात आज दहीहंडी उत्सव साजरा होत नाही, त्यावरुन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केले होते. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थीती सध्या झाली आहे. त्यामुळेच दुसरी लाट, तिसरी लाट आणि चौथी लाट अशी भीती घातली जातेय, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. पत्रकाराने तिसऱ्या लाटेसंदर्भात दिलेल्या प्रश्नावरही राज यांनी भन्नाट उत्तर दिलं.

 

यावेळी राज ठाकरेंना पत्रकारांनीकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना तिसरी लाट येतेय? याबद्दल राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, लाट यायला समुद्र आहे का, असा भन्नाट प्रतिप्रश्न राज यांनी केला. तसेच कुठं काही जाणवतंय का तुम्हाला. उगीच इमारती सील करायच्या, यापूर्वी या देशात कधी रोगराई आलीच नव्हती, असे म्हणत राज यांनी संताप व्यक्त केला

तसेचच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं सुरू आहे. मी तर बाहेर पडतोच आहे, मी माझ्या लोकांनाही सांगितलंय. सरकारने लवकरच मंदिरे उघडी न केल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटानाद करू, असा इशाराही राज यांनी दिला आहे. कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधाला न जुमानता आज ठिकठिकाणी मनसैनिकांनी दहीहंडी साजरी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

Team Global News Marathi: