ते हिंदू कधीपासून झाले हे पाहावं लागेल; पुन्हा संजय राऊतांनी भाजपाला डिवचले

 

हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये शाब्दिक चकमक वाढत चालली असून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वावर केलेल्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपवाले कधीपासून हिंदू झालेत हे पाहावं लागेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. भाजपचे हिंदुत्व हे त्वचेसारखं आहे. तर, शिवसेनेचे हिंदुत्व शालीसारखं असल्याचे वक्तव्य भाजप नेत्यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते कधीपासून हिंदू झाले हे तपासून पाहावं लागेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणार आहे. शिवचरित्रातून आजही प्रेरणा मिळते. दिल्लीचं तख्त वापरून महाराष्ट्राला झुकवू असं कुणी समज करून घेऊ नये असेही राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला. शिवरायांना उद्धवस्त करण्यासाठी दिल्लीतून आक्रमणं झाली. काहींची बोटं छाटली गेली.

त्यावेळी औरंगजेबदेखील स्वराज्याविरोधात महाराष्ट्रात आला होता. मात्र, त्यालाही येथेच मृत्यू पत्करावा लागला. शिवचरित्रातील हा महत्त्वाचा धडा शिवसेनेच्या शत्रूंनी कायम लक्षात ठेवावा असेही राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्र शत्रूसमोर झुकणार नाही, महाराष्ट्र कायम लढत राहणार आणि आम्ही स्वाभिमानासाठी आणि कष्टकऱ्यांसाठी लढत राहू असेही राऊत यांनी म्हटले.

 

Team Global News Marathi: