मोठी बातमी | ‘आप’कडून हरभजन सिंग यांना राज्यसभेची उमेदवारी

 

पंजाब | पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयी मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीने राज्यसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पंजाबच्या ५ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ ९ एप्रिल रोजी संपणार आहे. या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असून आपने क्रिकेटर हरभजन सिंग यांच्यासह आपचे दिल्लीतील आमदार राघव चढ्ढा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे चांचलर अशोक मित्तल आणि आपचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. संदीप पाठक आणि उद्योगपती संजीव अरोरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

हरभजन सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या राजकारणात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर, पंजाब विधानसभेत मोलाची कामगिरी केल्याबद्दल दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा आणि संदीप पाठक यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू होती. संदीप पाठक यांना आपचे चाणक्य म्हणून ओळखले जाते. पंजाबमध्ये पक्षाच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता.

सलग तीन वर्षे पंजाबमध्ये राहून त्यांनी बूथ स्तरापर्यंत संघटना उभारली आहे. ते आयआयटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक आहेत. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जवळचे मानले जातात. आपकडून अशोक मित्तल यांच्या नावावरही शिक्कामोर्तब केले आहे. ते लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत.

Team Global News Marathi: