कोरोना लस घेतल्यावर लैगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे का?

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घालणे सुरु केले आहे. आज अनेकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यात कोरोना होऊन गेल्यावर मानवी जीवनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात का असे अनेक प्रश्न आता जगभरातील नेटकऱ्यांना पडले आहे.

त्यात या बद्दलच पडणारे अनेक प्रश्न सर्च केले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे करोना लस घेतल्यानंतर आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध करू शकतो की नाही? असा प्रश्न सध्या गुगलवर जास्त प्रमाणात सर्च केला जातो आहे.

तसेच करोना लस घेतल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणं किती सुरक्षित आहे? अशा आशयाचे प्रश्न सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. मात्र या प्रश्नांवर वृत्तपत्रांनी तज्ज्ञांचे मत मांडले आहे.

करोना लस घेतल्यानंतर सेक्स करताना काळजी घ्यायला हवी.

-करोना लस घेणाऱ्या पुरुष आणि महिलांनी करोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर गर्भनिरोधकांचा वापर करायला हवा.

-SARS-CoV2 हा एक नवा व्हायरस आहे. त्याला निष्क्रिय करण्यासाठी लस तयार करण्यात आली आहे. पण या लशीचा दीर्घकालीन दुष्परिणाम काय आहे आणि त्याचा पुरुष किंवा महिलांच्या सेक्सवर काय प्रभाव होतो हे अद्याप सांगणं अशक्य आहे.

Team Global News Marathi: