मुंबई पालिकेच्या प्रत्येक प्रभागात सुरु होणार आंतरराष्ट्रीय विद्यापीठ शाळा, आदित्य ठाकरेंची माहिती |

 

मुंबई | राज्याचे पर्यावरण आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मंडळातील शाळा सुरु करणार आहेत. मुंबई महापालिका येत्या काळात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरू करणार असून विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे आता सामान्य अणि मध्यमवर्गीय घरातील मुलांना आंतरराष्ट्रीय विद्यपीठात शिकता येणार आहे. मुंबई महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या २४ प्रशासकीय प्रभागात प्रत्येकी एक सीबीएसई आणि एक आयसीएसई शाळा सुरू करणार असल्याचं वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पालिकेच्या नव्या शाळेचं उद्घाटन झालं. अझीझ बाग येथे पालिकेची सीबीएसई शाळा सुरु करण्यात आली. या शाळेत ४०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या उद्घाटन समारंभावेळी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. ही शाळा सुरू करणे हे माझं स्वप्न होतं. आज ते एक स्वप्न पूर्ण झालं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.

Team Global News Marathi: