इंडियन आयडॉलच्या नव्या पर्वाचा प्रोमो रिलीज, जजच्या पॅनलमध्ये कोणाला संधी ?

 

 

इंडियन आयडॉल लवकरच प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे. इंडियन आयडॉल’ त्याच्या 13व्या सीझनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे.नुकतंच ‘इंडियन आयडॉल 13’ चा पहिला प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धक आपल्या मधुर आवाजाची झलक प्रेक्षकांना दाखवताना दिसत आहेत.

लवकरच ‘इंडियन आयडॉल 13’ च्या ऑडिशन्स सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘इंडियन आयडॉल 13’ फ्लोअरवर आणण्यासाठी मेकर्सनी सर्व तयारी केली आहे. नेहा कक्कर ‘इंडियन आयडॉल 13’ चा भाग बनणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. गेल्या सीझनमध्येही नेहा कक्करने जजची जबाबदारी सांभाळली होती.

गेल्या सीझनमध्ये नेहा कक्करसोबत विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया हेही जज म्हणून दिसले होते. यावेळीही हे तीन स्टार्स ‘इंडियन आयडॉल 13’ मध्ये जज होणार आहेत. या शोची सर्वसामान्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ‘इंडियन आयडॉल 13’ मध्ये दिसणारे स्पर्धक रातोरात स्टार बनतात म्हणून अनेकजण यामध्ये आपले नशीब आजमावता. गेल्या सीझनमध्ये पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची चांगलीच चर्चा झाली होती.

या शोचे प्रमुख आकर्षण म्हणजे गायक हिमेश रेशमिया. हिमेशने जाजिंग करताना मागचा शो चांगलाच गाजवला होता. हिमेशने स्पर्धकांना दिलेल्या कर्मशीअल टिप्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. म्हणूनच यंदाचा सिझन देखील चांगलाच वादळी ठरणार आहे.

 

Team Global News Marathi: