राज ठाकरेंच्या फोटोत दिसणाऱ्या ग्लासमध्ये काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

 

मुंबई | मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शनिवारी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता या संदर्भातील फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. मात्र त्यांनी शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाल्याच दिसून आलं होत.

संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला म्हणून समाज माध्यमांवर ही चर्चा रंगलेली नाही ही चर्चा रंगली आहे या फोटोमध्ये दिसणार्‍या एका ग्लास मुळे, यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यामुळे या फोटोवरून ट्रोल सुद्धा करण्यात आले होते तसेच विविध कमेंट सुद्धा केल्या होत्या.

संदीप देशपांडे यांनी जो फोटो शेअर केला आहे त्या फोटो मध्ये ते राज ठाकरे यांना वाकून पाया पडत आहेत. आणि यावेळी याठिकाणी कडेला असलेल्या एका टेबलवर एक ग्लास आहे. आता या ग्लास मध्ये नक्की काय आहे हे कोणास ठाऊक, हा ग्लास नक्की कोणाचा आहे हे देखील माहीत नाही. मात्र त्या ग्लास वरून समाज माध्यमांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Team Global News Marathi: