“बास झालं! खूप त्रास सहन केला, सेना आमदारावर एकनाथ खडसे भडकले

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते अशातच आता भाजपाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले एकनाथ खडसे यांनी थेट मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आमदारावर संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. तसेच मुक्ताई मंदिरातील ५ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पाटील यांनी निशाणा साधला. एकनाथ खडसेंकडून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे, आता बस झाले त्रास सहन करणे, असा थेट इशारा सेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला.

एकनाथ खडसे यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्यावरून त्यांचे वैफल्य दर्शवते. हमी माझ्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरते. मीही महाविकास आघाडीचा एक घटक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मतदारसंघात विकास खुंटला, मी विकास कामे करायला लागलो आणि त्यांना जिव्हारी लागले, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Team Global News Marathi: