चेंबूर येथील दुर्घटनेत महानगर पालिकेचा निष्काळजीपणाच ठरला कारणीभूत – आशिष शेलार

 

मुंबई | मुंबईत रात्रभर पडणाऱ्या धो-धो पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका रात्रीत मुंबईत दोन दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे आता याच मुद्द्यावरून मुंबई मनपात विरोधात बसलेल्या भारतीय जनता पक्षाने या सर्व प्रकारचे खापर सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षावर फोडले आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असून मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी आज वाशीनाका येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेवर टीका केली. मी महापौरांवर बोलणं टाळत आहे. या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का? त्यामुळे महापौरांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

Team Global News Marathi: