मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक, मुंबईत धो-धो पडणाऱ्या पावसाचा घेणार आढावा

 

मुंबई |  शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच सतत पडणाऱ्या दिवस-रात्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका रात्रीत मुंबईत दोन दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी शोक व्यक्त करत राज्य सरकार तर्फे मदत जाहीर केली आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चर्चा करणार असून मुख्यमंत्री ठाकरे काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतली जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यात मुंबईतील पश्चिम आणि उपनगरांमध्ये पाणी साचलं. तर चेंबुरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळली. यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळीतही अशाच प्रकारची घटना घडली. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे

Team Global News Marathi: