राज कुंद्रा समर्थनात पुढे आली ही अभिनेत्री, शिल्पा-राज यांचा केला बचाव |

 

मुंबई | उद्योगपती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी फ्लीम प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात राज कुंद्राविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. राज कुंद्राला यानंतर २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या समर्थनार्थ राखी सावंत पुढे आली आहे. तिच्या वक्तव्यानं सर्वांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राखी सावंतनं राज कुंद्राच्या अटकेवर निराशा व्यक्त केली. तसंच तिनं शिल्पा शेट्टी हिचं कौतुक करत ती मेहनती अभिनेत्री असल्याचं म्हटलं. “शिल्पा शेट्टी या सर्व परिस्थितीतून जाण्यायोग्य व्यक्ती नाही असंही राही म्हणाली आहे. तिनं राज कुंद्रावर लावण्यात आलेले आरोप फेटाळत त्याला ब्लॅकमेल करण्याचे आणि त्याची प्रतीमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं तिनं बोलताना म्हटलं.

राही म्हणाली की, काही लोक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न करत आहेत. मी तिच्यावर मानापासून प्रेम करते. शिल्पा शेट्टीनं खुप मेहनत केली आहे हे मला लक्षात आहे. हा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न आहे. राज कुंद्रानं असं काही केलं असेल हे मी मानू शकत नाही,” असं राखी सावंत म्हणाली.

Team Global News Marathi: