राज ठाकरेंनी खास चित्रातून वाहिली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली !

 

मुंबई | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदीसह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना ट्विटरवरून आणि पुण्यात जाऊनही आदरांजली वाहिली होती. आज एक खास चित्र काढून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या खास व्यंगचित्रांच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी जे चित्र काढलं आहे ते देखील याच शैलीतलं आहे.

काय आहे खास या चित्रात

बाबासाहेब पुरंदरे हे स्वर्गात पोहचले आहेत, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांजवळ ते पोहचले आहेत. महाराज त्यांना म्हणत आहेत की, ‘ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जन्मभर पायपीट केलीस, अविश्रांत मेहनत घेतलीस. माझ्यासाठी संपूर्ण आय़ुष्य खर्ची घातलंस. आता ये आराम कर.’ असं म्हणत हे व्यगचित्र रेखाटण्यात आलं आहे. शिवाज्ञा असा मथळाही या व्यंगचित्राला देण्यात आला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी पहाटे पुण्यात निधन झालं. त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना समाजातल्या सगळ्याच दिग्गजांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली वाहिली आहे.

Team Global News Marathi: