उत्तर प्रदेशात योगी सरकार तब्बल ‘इतक्या’ जागा जिंकणार; सर्व्हेचा अंदाज !

 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तसेच काँग्रेस सुद्धा या निवडणुकीत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असून समाजवादी आणि मायावती यांच्या बहुजन समाजवादी पक्षाने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे.

त्यातच समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखेल असा अंदाज आहे. टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटच्या ओपिनियन पोलनुसार पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल. भाजपला ४०३ पैकी २३९ ते २४५ जागा मिळू शकतील, असं सर्वेक्षण सांगतं. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १२५ जागा मिळतील असा अंदाज आहे. बहुजन समाज पक्ष ३० जागांसह तिसऱ्या, तर काँग्रेस ५ ते ८ जागांसह चौथ्या क्रमांकावर असेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.

टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटनं केलेलं सर्वेक्षण खरं ठरल्यास योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. याआधी उत्तर प्रदेशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांना सलग दोन टर्म मिळालेल्या नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत योगींची कामगिरी चांगली झाल्याचं जनतेला वाटतं. जबरदस्तीनं केलं जाणारं धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याचे संकेत योगींनी दिले आहेत. त्याचा परिणाम सर्वेक्षणात दिसला.

Team Global News Marathi: