इगतपुरी रेव्ह पार्टी, या अभिनेत्रीला करण्यात आली अटक |

 

नाशिक | नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी २२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली.

वाढदिवसानिमित्त मित्रांना घेऊन इगतपुरी गाठली. केक कापल्यानंतर पार्टीत सारेच जण अंमली पदार्थांच्या नशेत तल्लीन झाले. इतक्यात पोलिसांची धाड पडली आणि पार्टी उधळून लावली. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. या पार्टीची चाहूल पोलिसांना लागली आणि नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाली.

यावेळी पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत असलेले १० पुरुष आणि १२ महिला अशा एकूण २२ जणांना ताब्यात घेतलं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तसेच पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं आहे. अटक झालेल्या व्यक्तींमध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळचा समावेश आहे. याशिवाय इटालियन महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Team Global News Marathi: