हाडे बळकट व मजबूत ठेवायची आहेत, तर मग करा हे उपाय नक्की करा..

 

आजकाल खूप कमी वयात युवकांना हाडांच्या दुखण्याची समस्या दिसते. लहान वयातील लोकांना सुद्धा हाडाचा त्रास होण्यास सुरुवात होते. त्याची हाडे मजबूत नसतात. त्याची कारणे अनेक वेगवेगळी आहेत. सध्या लोकांच्या धावपळीमुळे आपल्या आहाराकडे लोकांचे अजिबात लक्ष नसते. त्यामुळे जितक्या मोठ्या प्रमाणात बाहेरच्या वस्तू खाता येतील याचा विचार सर्वसामान्य लोक करत असतात. निरोगी शरीरासाठी जसे योग्य आहार आणि योग्य प्रकारचा व्यायाम गरजेचं असते. याच कारण आपण रोजच्या जीवनातील खाद्यपदार्थ. असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होतो आणि आपली हाडं ठिसूळ होऊन त्यांची दुखणी वाढतात. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांमुळे होतं हाडांचं नुकसान…

आजकाल लहान मुलांपासून सगळ्या लोकांना कार्बन डायऑक्सडाइड युक्त पेय जास्त आवडतात. कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बनडाय ऑक्साइड आणि फॉस्फरसचं प्रमाणं जास्त असतं. ज्यामुळे आपल्या हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे कोल्ड ड्रिक्स पिणं शक्यतो टाळावं. चहा आणि कॉफी मध्ये सुद्धा कॅफिन चे प्रमाण जास्त असते. चहा आणि कॉफीचं जास्त प्रमाणातील सेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकरक असतं. यातील कॅफीन हाडांना ठिसूळ बनवतं. अल्कोहोलच्या सेवनानं शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे हाडांची झीज होते आणि परिणामी हाडांची दुखणी वाढतात. अनेक व्यसने सुद्धा हाडे ठिसूळ बनवण्याचे काम करतात.

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकट असणे आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम याद्वारे आपली हाडे बळकट होण्यास मदत होते. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D ह्या दोन पोषकघटकांची आवश्यकता असते. यासाठी खाली आपली हाडे मजबूत व बळकट करण्याचे उपाय दिले आहेत.

चला तर मग जाणून घेऊयात हाडे बळकट व मजबूत होण्यासाठी उपाय….


दूध व दुधजन्य पदार्थ – दुधामध्ये कॅल्शियम मुबलक असते. एक कप दुधामध्ये 280 mg कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी दररोज कपभर दुधाचा आहारात समावेश असावा. दुधामध्ये प्रोटीनही भरपूर असल्याने मांसपेशींच्या आरोग्यासाठीही ते उपयोगी ठरते. याशिवाय दुधाचे पदार्थ म्हणजे दही, लोणी, तूप, ताक, पनीर यामुळेही भरपूर कॅल्शियम मिळत असते.

मासे – माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही.

मनुके – ऑस्टियोपिरॉसिस असलेल्या महिलांसाठी मुठभर मनुके खाणे गरजेचे आहे. त्यात इनुलिन नावाचे फायबर असते जे  शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. अर्थरायटिसच्या समस्येवरही मनुके खाणे फायदेशीर ठरते.

हिरव्या पालेभाज्या – कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D साठी आहारात विविध हिरव्या पालेभाज्या खाव्यात. पालक, ब्रोकोली, शतावरी यांमध्ये कॅल्शियम मुबलक असते.

तीळ आणि मेथीच्या बिया – तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 100 ग्रॅम तिळामधून 975 mg कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी आहारात तिळाची चटणी समाविष्ट करावी. याचप्रमाणे मेथी बियांचा वापरही आहारात करू शकता. मेथीच्या बियांमध्येही कॅल्शियम भरपूर असते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: