‘आता मंत्रालयातसुद्धा जायची वेळ झाली’ पुन्हा मनसेने लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

 

कोरोनामुळे गेल्या जवळपास दीड वर्षांपासून सर्व काही व्यवहार ठप्प होते. तसेच कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आता नियमांमध्ये शिथीलता देण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने सुरू असणाऱ्या शाळादेखील आता सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातच कोरोना संकटात वर्क फ्राॅम होम ही संकल्पना मोठ्या प्रमाणात नावारूपाला आली.

याच संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांनी देखील राज्याचा राज्य कारभार घरूनच चालवण्याच्या पद्धतीचा अवलंब केला. परंतू, आता यामुळे विरोधी पक्षांनी मात्र याच मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली होती . तसेच मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत यावरून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. पण कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सरकारच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलं आहे.

पण आता राज्य सरकारने शाळा सुरू केल्या असून यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्क फ्राॅम होमवरून त्यांच्यावर मनसे स्टाईल टीका केली आहे. ‘उठा, उठा शाळा चालू झाली, आता मंत्रायलयातसुद्धा जायची वेळ झाली’, अशा शब्दात ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मनसेकडून नेहमीच सरकारविरोधात टीकेची झोड उठवली जाते. त्यातच आता पुन्हा एकदा संदीप देशपांडें यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

 

Team Global News Marathi: