विनाकारण टेंशन टेंशन करत बसालं, तर तुम्ही लोकांसाठी एक टेंशन बनालं…

विनाकारण टेंशन टेंशन करत बसालं, तर तुम्ही लोकांसाठी एक टेंशन बनालं…

विनाकारण टेंशन टेंशन करत बसालं, तर तुम्ही लोकांसाठी एक टेंशन बनालं…..

मयुरी महेंद्र महाजन

मला नाही येतं, कधी टेन्शन असं म्हणणारी, व्यक्ती सुद्धा बऱ्याचदा टेन्शनमध्ये असते, फक्त ते सांगायला किंवा दाखवायला असते, परंतु त्या व्यक्तीलाही माहिती असते, की ती टेन्शन मध्ये आहे, अगोदर आपण हे समजून घेऊ टेन्शन म्हणजे नक्की काय????? तर बघा आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी, घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात, की त्याचा अप्रत्यक्ष रीत्या प्रभाव आपल्या मानसिकतेवरती होताना दिसतो, परंतु भविष्याविषयीची चिंता, नाही म्हटले ,तरी ती काही अंशी प्रत्येकात असते ,

आणि आयुष्याच्या संघर्षात, कधीकधी अशा संकटांच्या बेळ्यांमध्ये व्यक्ती सापडतो ,की आता पुढचे काय ????याची न होणारी उकल माणसाच्या टेन्शनचे कारण बनते, परंतु तरी सुद्धा टेन्शन म्हणजे काय?? तर समस्या ह्या प्रत्येकालाच असतात ,परंतु ज्याला त्या समस्या सोडवता येत नाही, त्यातून मार्ग काढता येत नाही, त्याला एक अनामिक हुरहुर असते, आणि तेच त्याच्या मनात दडपण साचून टेन्शन च्या रूपाने बाहेर पडते,

तसं तर ते प्रत्येकावरती ठरते ,की आपण टेन्शन किती घेतो, बघायला गेले तर छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा टेन्शन येऊ शकते, परंतु काही जण मोठ मोठी संकट देखील विना टेन्शनने देखील सोडवून घेतात, ही कला आहे ,हे जमायला हवे ,आणि जेव्हा टेन्शन येईल, त्या वेळेसं स्वतःला एकचं सांगावं ,की टेन्शन घेऊन कुणाचं भलं झालेलं आहे का???? की माझं होईल,,,,, ते आलेलं टेन्शन सुद्धा कधी पळून जाईल , समजणारंसुद्धा नाही ,आणि हो कर्माची गती मोठी गहन आहे, म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातात नाही ,त्या गोष्टीचे येणारे टेन्शन परमेश्वरावरती त्या अध्यात्मवरती सोडून द्यावे ,आणि आनंदाने पुढे चालावे,

कुठली गोष्ट घडण्याआधी ती तुमच्या विचारांच्या पातळीवरती घडते, म्हणून विचार ही सुद्धा एक कृती आहे, अंतर्मनात घडणारी, त्यामुळे जर आपण स्वतः, स्वतःला टेन्शन आहे , असे म्हणत असणारं, तर आपल्याला टेन्शन, टेन्शन करत बसण्याची वेळ येते ,त्यामुळे कुणीही आपल्या जवळ येण्याच्या ऐवजी आपल्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करेल ,कारण यामुळे आपण लोकांसाठी एक टेन्शन बनून राहणारं,

समाजात अशी बरीच मंडळी बघायला मिळते ,जे की त्यांना कोणी भेटले तरी ते आपलाचं दुखङा सांगत बसणार, आणि समोरच्याला ते ऐकण्याची अजिबात इच्छा नसते ,त्यामुळे अशा व्यक्तीची चुकून सुद्धा गाठ भेट घेण्याची टाळाटाळ होताना दिसते, कारण की विनाकारण अशी माणसं टेन्शन टेन्शन म्हणून बाकी लोकांची टेन्शन वाढवतात, तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्ती आपल्या स्तरावरती जीवनाशी संघर्ष करत आहे ,आणि हा संघर्ष प्रत्येकासाठी सुखद असेलचं, असे मात्र नाही, कारण प्रत्येकाच्या परिस्थितीत भिन्नता आहे, वेगळेपण आहे,

टेंशन हे टेन्शन असले ,तरी त्याचे प्रकारही आहेत ,काही गोष्टींचे टेन्शन हे तात्पुरत्या स्वरूपाचे बघायला मिळते, ते फक्त त्या गोष्टी पुरतेच मर्यादित असते, सर्व प्रकारची सुबत्ता असूनही ,त्याचे माझ्यापेक्षा चांगले आहे, परंतु माझे मात्र आहे, तसेचं, ही होणारी तुलना माणसाच्या विनाकारण टेन्शनचे मूळ कारण असते,

काही वेळेस समोरच्या व्यक्तीच्या दुःखामुळे ही टेन्शन येते, कधीकधी मोठी समस्या सुद्धा इतक्या सहजतेने सुटते, की आपल्या ते लक्षातच येत नसते, अरे आपण उगाच या गोष्टीचे टेन्शन घेत होतो, असे होते ,म्हणून समस्या सुटण्यासारखी असेल, तर त्यात विचार करण्यासारखे काय? आणि विचार करून ती सुटत नसेलं, तर विचार करण्याचा फायदा तरी काय?? त्यामुळे काही समस्या सोडवायच्या असतात, काही सोडूनच द्यायच्या असतात ,

कारण आपल्या आनंदाची गुरुकिल्ली ही आपल्याच हातात असते, काही गोष्टी टेन्शन घेण्यासारख्या असतातही, परंतु ज्या गोष्टी टेन्शन घेण्यासारख्या अजिबात नाही, तर फालतूच्या गोष्टीचे टेन्शन घ्यायचे नाही, येथे लोकांची विविध रूपे असतात, लोक देवावर पण नाराज होतात, तर आपण कोण??? त्यामुळे लोड घ्यायचा नाही, मस्त आनंदात आयुष्य जगावं, कुणाचे वाईट करायचे नाही ,कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून वागायचे, काहीही कमी पडत नाही, आणि फरक तर अजिबात पडत नाही,

आयुष्य एकदाच मिळते, त्यामुळे आपणच ठरवायचे टेन्शन म्हणून जगायचे, कि सुखाने ,कारण टेंशन काय येणारच आहे, दिलखुलास जगून तर घेऊया, आपणच ठरवायचं कसं जगायचं, कण्हत कण्हत ,की गाणं म्हणत, म्हणत,…. आपणच ठरवायचं..

ग्लोबल न्युज नेटवर्क: