“काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होती. त्यातच येणाऱ्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढणार असे संकेत सुद्धा देण्यात आले होते. मात्र दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम केले होते. त्यातच पटोले यांच्या विधानानंतर शिवसेना आणि राष्ट्र्वादीने स्वबळाच्या विधानावरून पटोलेंना टोला सुद्धा लगावला होता. आता स्वबळाच्या विधानावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी भाष्य करत शिवसेनेला डिवचले आहे.

काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला किंवा शिवसेना पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?, अशा सवाल संजय निरुपम यांनी विचारला आहे. ते मुंबई माध्यमांशी बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एकला चलो रे या घोषणेवर मी सहमत आहे. कॉँग्रेसला संपवण्यासाठी किंवा सतत तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केला जातो. पण मला वाटतं काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. जर काँग्रेस स्वबळावर लढत असेल, तशी इच्छा असेल तर शिवसेनेला, किंवा त्यांच्या प्रक्षप्रमुखांना मिरची झोंबायचे कारण नाही, असं संजय निरुपम म्हणाले.

सामना अग्रलेखात राहुल गांधी फक्त ट्विटरच्या माध्यमातून उपक्रम राबवतात असे छापून आले होते. पण मला संजय राऊतांना सांगायचंय की कोरोना काळात मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंपेक्षा राहुल गांधींचं काम जास्त आहे, अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे. आता निरुपम यांच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: