गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे, गुलाबराव पाटील यांच्या टीकेला रक्षा खडसे यांनी जोरदार प्रतिउत्तर !

 

जळगाव | केळी पीक विम्याचे निकष बदलल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे आता सोपं झालं आहे मात्र दुसरीकडे यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात श्रेयवाद घेण्यासाठी चांगलीच लढाई सुरु झाली आहे. तसेच याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे.

त्यातच शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करत असल्याचा आरोप करत जोरदार टीका केली होती. त्यावर आता भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

त्या म्हणाल्या की, केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं, असा टोला रक्षा खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला होता.

Team Global News Marathi: