काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही’ हा सरकारचा नारा आहे का? नवाब मलिक यांच्यावर साधला शेलारांनी निशाणा

 

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून एनसीबीने केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्ष आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यवर अनेक गाम्भीर स्वरूपाचे आरोप केले आहे. या आरोपांना विरोधकांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे. आता त्यापाठोपाठ आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा नवाब मलिक यांच्यावर निशाणा सोडला आहे.

ज्याचा जावई गंजडी म्हणून पकडला गेला त्या मंत्र्याला लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. दारू आणि गुत्याच्या वसुलीत अधिकारी लावले जातात. मग अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर ते पोपटासारखे बोलू लागतात. बार आणि गुत्यांमधून वसुली कशी करायला लावली हे सांगतात. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे अशी टीका केली आहे

तसेच पुढे शेलार म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, देशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य सुरू आहे. महाराष्ट्रातही तेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा नारा काही तरी वेगळा दिसतोय. ‘काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही’ असा काही नारा आहे का? स्वत: काही काम करायचे नाही. यंत्रणांना काम करु द्यायचे नाही.

भ्रष्टाचाराविरोधात बोलायचे नाही, भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायचे नाही, गांजामध्ये अटक झालेल्यांवर कारवाई करायची नाही, महिलांवरील अत्याचाराबाबत बोलायचे नाही… हे सर्व प्रश्न मांडले तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची ढाल पुढे करायची. यातून मुख्यमंत्री तुम्ही स्वत:चं पाप लपवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली.

Team Global News Marathi: