चित्रपटसृष्टीत हळहळ ; अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

मुंबई :बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Siddharth Shukla) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात (kapoor Hospital) त्याने अखेरचा श्वास घेतला .

माहितीनुसार,सिद्धार्थ शुक्लाने झोपण्या अगोदर काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती रुग्णालयाने जाहीर केली आहे . चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‌ॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभागी झाला होता आणि विजेताही ठरला होता. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे .

सिद्धार्थने हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम केले . तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे.

त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले . 2014 मध्ये, शुक्लाने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: