” सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत”

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून शाळा बंदठेवण्यात आल्या होत्या. साहाराज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून शाळा पुन्हा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं १ सप्टेंबरपासून दिल्लीसह राजस्थानमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

मात्र महाराष्ट्रातही शाळा कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: