जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे राशीभविष्य, सोमवार, ५ ऑक्टोबर २०२०
मेष:-दिवस मनासारखा घालवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. इतरांचे गैरसमज दूर करावे लागतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृषभ:-मनाची द्विधावस्था टाळावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दिवसभर कामाची धांदल राहील.
मिथुन:-लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघात प्रतिष्ठा कमवाल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल.

कर्क:-उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. आवडते पदार्थ चाखाल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल. आवडीच्या वस्तू खरेदी कराल.
सिंह:-गुंतवणूक विचारपूर्वक करावी. संमिश्र घटना जाणवतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींकडे कल राहील. क्षुल्लक मुद्दा वादाचा ठरू शकतो.
कन्या:-तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल. कार्यालयीन सहकारी उत्तम साथ देतील. जोडीदाराला खुश करावे.

देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र

तूळ:-मानसिक आरोग्य जपावे. ग्रहमानाची साथ लाभेल. आपले विचार ठामपणे मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधाल. मनातील नसत्या कल्पना काढून टाका.
वृश्चिक:-उधारी वसूल करण्याच्या मागे लागा. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. फसव्या लोकांपासून सावध राहावे. मेहनतीच्या जोरावर कामे कराल. प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील.

मुंबईतील लोकल केव्हा सुरू होणार ? ; रेल्वेमंत्र्यांनी केला मोठा खुलासा

धनू:-अति गोड पदार्थ खाणे टाळावे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. घरात शांतता नांदेल. धार्मिक कामाकडे कल राहील.
मकर:-घरासाठी खरेदी केली जाईल. चिकाटीने कामे करावीत. मौल्यवान वस्तु लाभतील. अनावश्यक खर्च संभवतात. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

कुंभ:-सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. नातेवाईकांची खुशाली कळेल. बौद्धिक कामात लक्ष घालाल. तिखट शब्द टाळावेत. खर्च मर्यादित ठेवावा.
मीन:-दिवस मनासारखा घालवाल. धडाडीने कामे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

‘ कोरोना किलर ‘ च्या सिद्धतेवर आयसीएमआरचे शिक्कामोर्तब

ग्लोबल न्युज नेटवर्क: