कोरोनाला रोखण्यासाठी ‘कोरोना किलर’ उपकरण बसवा अन सुरक्षित रहा; ICMR ने ही दिली मान्यता
ग्लोबल न्यूज – आयनायझेशनच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणूपासून रक्षण करणाऱ्या ‘कोरोना किलर’ या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) तर्फे कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनीने संशोधित केलेले आणि मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण ठरले आहे . या उपकरणामुळे कोरोनाचा वाढता प्रसार कमी करण्यास मदत तर होतेच शिवाय आपण ज्याठिकाणी बसतो त्या ठिकाणी आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता यामुळे अधिक भक्कम होते.
कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी ही माहिती दिली. ‘कोरोना किलर ‘ हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर,किंवा इतर केमिकल्स न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते कोणत्याही बंदिस्त परिसरात वापरता येते.
घर, हॉस्पिटल, शाळा,महाविद्यालये, हॉस्पिटल, चारचाकी गाड्या, विमान, प्रयोगशाळा, क्वारंटाईन सेंटर, कारखाने, मंदिरे ,सरकारी कार्यालये,मेडिकल स्टोअर, पोलीस स्टेशन, हॉटेल, रेल्वे डबे, एस टी बसेस, विमाने, सर्व प्रकारची छोटी-मोठी व्यापारी दुकाने अशा कोणत्याही ठिकाणी ते वापरता येते.
या इलेक्ट्रॉनिक उपकरणास ICMR व NIV तर्फे मान्यता देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील संसर्ग रोगाच्या नायडू रुग्णालयानेही यशस्वी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे.यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाची ही मान्यता मिळाली आहे. कोविड रुग्णाचे मास्क, हातमोजे, बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते.
पुण्यातील शिवणे भागात असलेल्या या कंपनीमध्ये या उपकरणाचे उत्पादन सुरु असून दररोज 200 उपकरणे निर्मितीची कंपनीची क्षमता आहे . ही क्षमता दररोज 700 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व नियम पाळून वाहतुकीसाठी सरकार सहकार्य करील, अशी अपेक्षा भाऊसाहेब जंजिरे यांनी व्यक्त केली आहे. या उपकरणाचा पुरवठा देशात आणि देशाबाहेरही केला जात आहे.
बार्शी-पुणे आणि मुंबई आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या सहयोग क्रिएशन प्रा. ली या कंपनीकडे कोरोना किलर या मशिन्स च्या मार्केटिंग साठी महाराष्ट्राचे अधिकृत डिस्ट्रिब्युटर्स म्हणून जबाबदारी दिली आहे.सहयोग च्या वतीने राज्यभर तालुका स्तरावर डीलर नेमण्याचे काम ही सुरू झाले आहे. ज्यांना डीलरशिप हवी आहे त्यानी 7507190144, 7507190166, या क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www. sahyogcreations.com या वेबसाईट ला भेट देऊ शकता असे सहयोग क्रिएशन चे चेअरमन संतोष ठोंबरे यांनी सांगितले.
असा निष्क्रिय केला जातो कोरोना
या मशिनमधून तयार झालेले आयन हवेत पसरतात. ज्याठिकाणी मशिन बसवले आहे. त्या क्षेत्रातील(उदा: हॉल, ऑफिस, केबिन इ)कोरोना व्हायरस आणि इतर सर्वच सूक्ष्मजीव जे आपल्याला हानिकारक असतात. त्यांचा समूळ नायनाट करतात.