कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना कसे आमंत्रित केले नाही?, नितेश राणे यांचा सवाल

मुंबई :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसंच सायंकाळी साडे पाच वाजता महापौर निवास, दादर, येथे सदर कार्यक्रम पार पडणार आहे.

मात्र या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित न केल्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना कसे आमंत्रित केले नाही? प्रोटोकॉल? मनोरंजक, असे म्हणत नितेश राणेंनी ठाकरे सरकारला सवाल विचारला आहे.
तसेच या कार्यक्रमाला राज्यासह विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही हाच मुद्दा पकडून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, , आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत, असा निशाणा त्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.

Team Global News Marathi: