ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला किती राग आहे ते वागणुकीतून दिसतंय – नाना पटोले

 

राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजत असताना याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाडताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मोदी सरकारवर टीका केली आहे.

मी विधानसभेचा अध्यक्ष असताना पहिला ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडला होता. मात्र, ओबीसी समाजाचं नुकसान करण्याचं षडयंत्र केंद्राने रचले आहे आहे. केंद्र सरकार ओबीसी समाजाची जनगणना करणार आणि त्यासंबंधीचा आकडादेखील देणार नाही, असं केंद्र सरकरने संसदेत स्पष्ट केलं होत. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल केंद्राला किती राग आहे, हे लक्षात येतंय, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

२९ जुलै रोजी बारामतीत पक्ष विरहित एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू या मोर्चासाठी बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही. या मोर्चात भाजप आणि राष्ट्रवादीसह सर्व पक्षाचे नेते सहभागी होणार होते. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे परवानगी नाकारली गेल्याचं कळतं आहे. त्यामुळे आता मोर्चा होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Team Global News Marathi: