मराठा समाजाला मागास ठरविल्याशिवाय आरक्षण कसे मिळणार? – विनायक मेटे

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजत असताना याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाडताना दिसत आहे. त्यात आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.

मराठा समाजाला मागास ठरवल्याशिवाय आरक्षण कसं मिळणार? या प्रश्नाचं उत्तर अशोक चव्हाण यांनी द्यावं, अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. अशोक चव्हाण केवळ मराठा आरक्षण प्रश्नावर राजकारण करतायत, मराठा समाजाला मागास कसं ठरवणार हे आधी चव्हाणांनी स्पष्ट करावे राजकारण करून प्रश्न मिटणार नसल्याचे देखील मेटे यांनी म्हटलं आहे.

तसेच आजच्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांनी दिन दलित समाजातील बांधवांसाठी आरक्षण कायदा लागू केला होता. आज याला १२० वर्ष पूर्ण झालंय. तरी देखील या दिवसात सरकारला शहाणपण सुचलं नसल्याचे म्हणत मेटे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Team Global News Marathi: