राशिभविष्य: कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी ; वाचा सविस्तर-

आजचे पंचांग – वार गुरुवार, दि. 03.03.2022

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ — दुपारी 01.30 ते 03.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ 20.03 पर्यंत नंतर मीन.
—————————————-

आजचे राशीभविष्य

मेष (शुभ रंग – पिस्ता)

दैनंदिन सर्व कामे सुरळीत पार पडतील. स्वतःचे काही छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. काही अपुरी स्वप्ने पूर्ण होतील.

वृषभ- ( शुभ रंग- क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. तुमच्याअधिकारात वाढ होईल. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे आहे. पिताश्री आज योग्य सल्ला देतील मित्रांना मात्र लांब ठेवा.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्या.

कर्क – (शुभ रंग- सोनेरी)

काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पोट बिघडणार आहे, खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा तरुणांनी चुकीची संगत टाळून आपली प्रतिष्ठा जपा.

सिंह- (शुभ रंग – पांढरा)

आज नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. इच्छित ध्येय साध्य होतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.

कन्या – (शुभ रंग- गुलाबी)

आज काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लगार मंडळीचे सल्ले मनावर घेऊ नका. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे लक्षात असूद्या.

तूळ -( शुभ रंग- मोरपिशी)

मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल.

वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी )

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल. घराच्या नूतनीकरणाचे मनावर घ्याल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने समाधानी व्हाल.

धनु – ( शुभ रंग-आकाशी)

नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा ही अतिरेक नको, कारण त्याने निराशा पदरी पडू शकते.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. विरोधकांना तुम्ही चोख उत्तर द्याल. लहान भावंडांस मदत कराल. उत्साही दिवस.

कुंभ -( शुभ रंग – सोनेरी)

आज हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. आपल्या अधिकारा बरोबर कर्तव्यांचा ही विचार करा. व्यापाऱ्यांसाठी अतिउत्तम दिवस आहे. वाणीत मृदुता मात्र गरजेची.

मीन – ( शुभ रंग – निळा )

आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. मोठ्या लाभाच्या मोहाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. क्रोधावर लगाम आवश्यक आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: