राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

आजचे पंचांग – वार गुरुवार, दि. 27.01.2022

शुभाशुभ विचार- 15 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – सकाळी 8.51 पर्यंत विशाखा, नंतर अनुराधा.
नक्षत्र पाया- ताम्र.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————————

आजचे राशीभविष्य.

मेष ( शुभ रंग मोरपिशी)

आज कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. सतत कामामुळे दिवस कंटाळवाणा जाईल. उधारी उसनवारी आवर्जून टाळा. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

वृषभ – ( शुभ रंग जांभळा )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रेम प्रकरणाना थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

मिथुन- ( शुभरंग- मरून )

संमिश्र फळ देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळ जास्त होईल. नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल. गोविंदा थकवा जाणवेल.

कर्क- ( शुभ रंग- मोतिया )

आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.

सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. मुलांचे लाड करताना त्यांच्या शिस्तीस ही प्राधान्य द्या.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार आज नकोत. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.

तूळ- ( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. वाणीत मृदुता हिताची राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. आज तुम्ही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.

धनु – ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. पायपीट होईल.

मकर- ( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. इच्छापूर्ती चा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.

कुंभ- ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल. आपल्या पिताश्रींनी दिलेले सल्ले विचारात घ्या.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपुन वापरावी. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: